अमित गोरखे यूथ फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी : अमित गोरखे यूथ फाऊंडेशन व भाजपा प्रभाग १० च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कार्यक्षम नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त महिलांसाठी आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिरात एकूण ६४० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गर्भाशयाच्या कर्करोग, शुगर, हृदयरोग, हृदयाची सोनोग्राफी, किडनी, हाडांच्या विविध तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या.
या शिबिराच्या उद्घघाटन पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकशाहीर अणणाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) अमित गोरखे, क्राडी समिती सभापती तुषार हिंगे, नगरसेवक अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भीमा बोबडे, मधुकर बाबर, जयश्री वाघमारे, भाजप शहर उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, महिला मोर्चाच्या कोमल काळभोर, नंदा करे, कविता हिंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे बबनराव वाडेकर, सुनिता कोकाटे, मनिषा भोसले, पुजा वायचळ, डॉ. प्रमोद कुबडे, आयकॉन हॉस्पिटलचे डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. जितेश मवानी, डॉ. शेखर राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले, “अमित गोरखे यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरखे कुटुंबीय खूप पूर्वीपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात आहेत. ते करताना तळागाळातील लोकांची आणि समाजाची गरज ओळखून नगरसेविका अनुराधाताई गोरखे आणि अमित गोरखे काम करतात. या शिबिरातून अधिकाधिक महिलांना चांगले उपचार होण्यास मदत होईल”.
प्रास्ताविक करताना अमित गोरखे यूथ फाऊंडेशनचे संस्थापक व अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाल की, “सामाजिक व आता राजकीय जिवनात काम करताना अनेक गोष्टी आईकडून शिकलो आहोत. कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेत असताना महिला वर्गांकडून स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचे आरोग्य सदृढ राहिले, तर संपुर्ण कुटुंब सदृढ राहते. हा हे शिबिर घेण्याचा उद्देश असून गंभीर आजाराचे निदान झाल्यास शासनाच्या योजना व मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यात येईल”.
आयकॉन हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने हे सर्व निदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. भाजपा अनुसूचित जाती महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्षा कोमल शिंदे, प्रशांत शिंदे, शेखर साळवी, दिनेश देशमुख यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.