मुंबई । वस्त्रोद्योग उद्योजकांच्या सूचना, हरकती शासनाने जाणून घेतल्या असून या सर्वांचा अभ्यास करून राज्याचे सर्वसमावेशक वस्त्रोद्योग धोरण 2017 ते 2022 तयार करण्यात येईल, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, राज्यातील वस्त्रोद्योग संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कापूस ते कापड निर्मिती प्रक्रियेवर भर देण्यात येत आहे.
वस्त्रोद्योगात 40 हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र वस्त्रोद्योगामधील अग्रणी राज्य व्हावे, याकरिता शेतकरी बांधवांपासून वस्त्रोद्योगामध्ये काम करणार्या कामगारांचा तसेच उद्योजकांच्या सूचनांचा धोरण तयार करताना विचार करण्यात येईल. सन 2011 ते 2017 या कालावधीत वस्त्रोद्योग क्षेत्रात 40 हजार कोटींची गुंतवणूक आणि 11 लाख रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात 17,304.53 कोटींची गुंतवणूक झाली असून त्या माध्यमातून 2,62,906 एवढी रोजगार निर्मिती झाली आहे.