जळगाव- देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या व कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी आज संघटनात्मक आढावा बैठक आयोजित केली आहे. ज्यात त्या कॉंग्रेसच्या नेत्यांना मागदर्शन करत आहेत.या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. नेत्यांच्या तोंडाला मास्क होते मात्र सोशल डिस्टन्सिंग नावाला सुद्धा पाळले गेले नव्हते.
कोरोनाची काळजी म्हणून जिल्हात कडक निर्बंध आहेत.लग्नात ५० हून अधिक नागरिक असतील तर गुन्हे लावले जात आहेत. लपून छपून व्यवसाय केला तर दुकान सील केली जात आहेत. अश्या परीस्थित सत्ताधारी कॉंग्रेस नेत्यांवर कारवाई होणार का ? कि प्रशासन सत्ते समोर झुकणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.