नवी दिल्ली । देशभरातील 9 शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत घरांच्या किंमतीत सात टक्क्यांनी घट झाली आहे. त्यापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत ही घट नोंदविण्यात आली आहे.
घरांची मागणी घटल्याने बांधकाम व्यावसायिकांनी किंमती कमी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून ही घट झाली आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाण्याचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त गुरूग्राम, नोएडा, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू व चेन्नई या शहरांमध्ये घरांच्या किंमती घटल्या आहेत. चालू वर्षात मध्यम ते किफायतशीर किंमतीतील घरे बांधण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल राहणार आहे.