मुंबई-आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेससोबत इतर २१ पक्षांनीही बंदला पाठींबा देत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. मात्र भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. काही ठिकाणी शाळेच्या बसवर दगडफेक झाल्याचे दिसून आले आहे. या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
लहान मुलांच्या स्कुलबस वर दगडफेक करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध. बंद पुकारणाऱ्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही दगडफेक केली? सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी लहान मुलांनाही सोडलं नाही. २०१९ ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता आज बंद पुकारणाऱ्या पक्षांना चांगलाच धडा शिकवेल.
जाहीर निषेध. https://t.co/PwiIlhzo2f
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 10, 2018
गणेशोत्सवासारख्या आनंद देणाऱ्या सणासुदीच्या मुहूर्तावर भारत बंद करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.#पापी_काँग्रेस #PapiCongress https://t.co/GTsFmpMMKA
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 9, 2018
लहान मुलांच्या स्कुलबस वर दगडफेक करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध. बंद पुकारणाऱ्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही दगडफेक केली? सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी लहान मुलांनाही सोडलं नाही. २०१९ ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता आज बंद पुकारणाऱ्या पक्षांना चांगलाच धडा शिकवेल असे भाजपने ट्विटकरून काँग्रेसला लक्ष केले आहे.