भविष्य वास्तू कोश पुस्तकाचे प्रकशन
चिंचवड : मनुष्याच्या जीवनावर ग्रह आणि नक्षत्र यांच्या भ्रमणाचा भला-बुरा परिणाम होत असतो. उमेश स्वामी यांनी लिहिलेल्या भविष्य वास्तू कोशी या पुस्तकामध्ये राशी भविष्य तसेच वास्तू शास्त्राशी संबंधित माहिती सामान्यांपर्यंत अगदी सोप्या शब्दात पोहचते. हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना मार्गदर्शक ठरेल, असे मत वाई संस्थानचे मठाध्यक्ष ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
येथील रहिवासी उमेश स्वामी (हिरेमठ) यांनी लिहिलेल्या भविष्य वास्तू कोश पुस्तकाचे प्रकाशन महादेव शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक ग्रुपचे अध्यक्ष गुरूराज चरंतीमठ, पिंपरी-चिंचवड जंगम समाजाचे अध्यक्ष संजय मानूरकर, ओव्हीन फॅसिलीटीचे संचालक जयदीप पवार, बांधकाम व्यावसायिक राजेश चिट्टे, नगरसेवक राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते. लेखक उमेश स्वामी यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश सांगितला.