सर्वांगीण विकसीत शिक्षणपिढी निर्माण होणे समाज उत्थानासाठी आवश्यक

0
 माजी आमदार शिरीष चौधरी ; फैजपूरात ‘धनोत्सवा’चा समारोप
फैजपूर– देशाच्या विकासासोबत विश्वात शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक नागरीकाने आपला सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे विद्यार्थी दशा आणि विद्यार्थी दशेचा सुवर्ण काळ म्हणजे स्नेहसंमेलन. त्यामुळे प्रत्येकाने संधीचे सोने करून आत्मविकासासोबत देशाच्या विकासात मोलाची भर टाकावी तसेच समाज उभारणीसाठी शिक्षित तरुण पिढी निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत  माजी आमदारशिरीष चौधरी यांनी येथे व्यक्त केले. फैजपूर येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2017-18 च्या रंगतरंग स्नेहसंमेलन धनोत्सवानिमित्त वार्षिक पारीतोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
 यांची होती उपस्थिती
भुसावळच्या दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी तापी परीसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा.चेअरमन प्रा.के.आर.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके, सदस्य प्रा.पी.एच.राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, कै.लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ़ फार्मसीचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, पदविका औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.एल.चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम.बी.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यात शैक्षणिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसोबत क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विविध सांस्कृतिक व स्पर्धेतील यशस्वीतांचा गौरव करण्यात आला.
 यांनी घेतले परीश्रम
औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दैनंदिन जीवनात रसायनशास्त्र या विषयावर पोस्टर प्रदर्शन करून विविध उपयुक्त विषयावर उत्तम सादरीकरण केले. त्यासाठी रसायन विभागप्रमुख, प्रा.डॉ.ए.के.पाटील, उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे, प्रा.डॉ.हरीश तळेले, प्रा.राकेश तळेले, प्रा..शेरसिंग पाडवी आदींनी परीश्रम घेतले.  स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, यावर्षीचे धनोत्सव 2017 चे  चेअरमन प्रा डॉ जी एस मारतळे विद्यापीठ प्रतिनिधी स्वप्नील चौधरी विद्यार्थिनी प्रतिनिधी विशाखा महाजन आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.सागर धनगर व डॉ.कल्पना पाटील यांनी तर आभार स्वनिल चौधरी यांनी मानले.