शिरपूर । तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या जमिनीला पाणी देण्याचे काम शिरपूर पॅटर्नच्या जलसंधारणाच्या माध्यमातून सुरु असून सर्वत्र हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या कामातूनच शेतांपर्यंत रस्ते देखील करण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणातून तालुक्यातील मुलामुलींना उज्ज्वल भविष्यासाठी घडविण्याचे काम होतेय. पटेल परिवाराने शिरपूर तालुक्यासाठी अहोरात्र परीश्रमातून खूप काही देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी एकत्र येवून विकासकामांमधून तालुक्याला पुढे नेवू या असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले. अध्यक्षीय भाषणात आ.काशिराम पावरा म्हणाले की, शिरपूर तालुक्यातील सर्व गावांना पाण्याची उपलब्धता व्हावी तसेच भविष्यात पिढयानपिढया पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्नअंतर्गत मोठया प्रमाणात कामे सुरु आहेत.
कामास प्रारंभ
तालुक्यातील आंबे येथे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर पॅटर्न अंतर्गत 180 व 181 व्या बंधार्यांचे भूमिपूजन करण्यात येवून लगेचच कामास प्रारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आ.काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, सुरेश खानापूरकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता हितेश भटूरकर, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, सरपंच कृष्णा पावरा,उपसरपंच संदीप देशमुख, हिरालाल देशमुख, हिरालाल पावरा, मदन पावरा, आंबे येथील वि.का. सोसायटी चेअरमन रमेश माळी, मोहनसिंग पावरा, सजन पावरा, रेवा पावरा, सुनिल पावरा, पदमसिंग परदेशी, बुधा पावरा, सूतगिरणीचे संचालक सत्तारसिंग पावरा, भटू माळी, सुभाष मुरलीधर कोळी, सुभाष रमेश कोळी, आधार कोळी, सुदाम राजपूत, मोहन पावरा, भायशा पावरा, रमेश पावरा, शंकर बोरसे,अस्तर पावरा, रोशनी पावरा, शिका-या पावरा, राजेश भंडारी, संजय चौधरी, प्रकाश गुरव, सुनिल जैन, जयदीप राजपूत, किशोर माळी, धीरज देशमुखयांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.