सर्वात श्रीमंत ठरलेल्या ‘अॅमेझॉन’च्या जेफ बेझोसना भारताने केले कंगाल!

0

नवी दिल्ली | ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या ‘अॅमेझॉन’चे संस्थापक असलेल्या 53 वर्षीय जेफ बेझोस यांना अवघ्या काही तासात आपले स्थान गमवावे लागले ते भारतामुळेच! आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यात समाधानकारक कामगिरी नसल्याने ‘अॅमेझॉन’च्या शेअर भावात घसरगुंडी झाली. त्यामुळेच बेझोस यांचे एकून संपत्तीमूल्य खालावून त्यांना आपले स्थान गमवावे लागले. ‘अॅमेझॉन’चे दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत 857 वरून 197 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत घसरले.

गुंतवणूक सुरूच ठेवणार
अॅमेझॉन भारतातील गुंतवणूक सुरूच ठेवणार आहे. ‘अॅमेझॉन’ने उत्तर अमेरिकेबाहेर जगात सर्वाधिक गुंतवणूक भारतातच केली आहे. आता ईको डिव्हायसेस आणि अॅलेक्स्झा प्लॅटफॉर्ममध्ये कंपनी गुंतवणूक करणार आहे. भारतामुळे बेझोस यांच्या श्रीमंतीचे स्थान पुन्हा घसरले असले तरी त्यांना इथवर भारतानेच पोहोचवलेय. 2016च्या पहिल्या तिमाहीत 135 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स असलेले उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत 481 व अखेरीस 724 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर भारतानेच पोहोचविले. अमेरिकेत होल फूट दुकान साखळी सुरु केल्यानंतर भारतातही कंपनी मॉल सुरु करणार आहे.

लक्ष्याहून दीडपट निधी
गेल्यावर्षी भारतात 2 अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतविण्याची घोषणा ‘अॅमेझॉन’ने केली होती. प्रत्यक्षात दीडपट म्हणजे 3 अब्ज गुंतवणूक केली. याच महिन्यात पुन्हा 1,680 कोटींची गुंतवणूक लॉजीस्टिक व गोदामात करण्यात आली. याशिवाय डाटा सेंटर व क्लाऊड बिझनेस सेवात 1,382 कोटींची गुंतवणूक केली गेली. ऑनलाइन रिटेलर असलेली ही आता तंत्रज्ञान कंपनी झालीय. क्लाऊड कॉम्प्युटिंग, ऑनलाइन व्हिडीओ आणि कॉम्प्युटिंग हार्डवेअर सारख्य क्षेत्रात तिचा शिरकाव झालाय.

1.206 अब्ज डॉलर्स तोटा
ताज्या तिमाही निकालात जागतिक मंदीचा फटका ‘अॅमेझॉन’ला बसला. या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात तोटा 1.206 अब्ज अमेरिकी डॉलर्स झालाय. गेल्यावर्षी तो याच काळात फक्त 255 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका होता. तूर्तास मागे पडले असले तरी जेफ बेझोस येत्या काही दिवसात बिल गेट्स यांचे स्थान पटकावतील, असा अंदाज आहे. ‘अॅमेझॉन’मध्ये 17% वाटा त्यांचाच आहे.

10:10 वाजता सकाळी

5,80,000 हजार कोटी रुपये