नवी दिल्ली-भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे.
जाहीरातींच्या माध्यमातून सिंधूने यंदाच्या २०१८ या वर्षात अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. महत्वाची गोष्ट मध्ये पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.