शहादा । येथील नगरपालीकेने 31 मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात कर वसुली व व्यापारी संकुलाचे भाडे गोळा केल्याची माहिती कर निरिक्षक रविंद्र चव्हाण यांनी दिली. करवसुलीसाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील , मुख्याधिकारी राहुल वाघ, कर निरिक्षक रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाचे पितांबर चव्हाण, सुनिल भारती, दिलिप कोळी, निंबा बढे , दत्तु भोइ , उमाकांत शिंपी , पुरुषोत्तम शिवदे , दिलिप सोनवणे , खलील तेली , दुर्गा वैदु , यशवंत तांबोळी , ब्रिजलाल पाटील , दिपक चौधरी ,अनिल पाटील , किशोर मोरे यांच्या समावेश होता.
दोघ कर्मचार्यांना पाच हजारांचे बक्षीस
वसुलीसाठी एकुण दहा पथक करण्यात आले होते. यावर्षी घरपट्टी वसुली ही घरकुल योजनांमुळे जास्त प्रमाणात झाली. पाणीपट्टी एकूण मागणी 2, 09,01,242 रुपये एवढी होती व वसुली 99,90,571 एवढे म्हणजेच 48 % झाली. घरपट्टी एकुण मागणी 2,85,38,575 रुपये एवढी तर वसुली 1,99,97,278 रुपये एवढी म्हणजेच 70%झाली. व्यापारी संकुल (गाळे) 19,25,656रुपये पैकी वसुली 19,04,209 रुपये म्हणजेच 98% झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कर वसुली झाल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला. गाळ्यामध्ये गाळेभाडे एकूण मागणी 81,26,821रुपये पैकी 77,05,550 रुपये म्हणजेच 94 % गाळे भाडे वसुल केल्याची माहिती पितांबर चव्हाण यांनी दिली. पाच गाळे सिल केले होते त्यापैकी चार गाळ्यांची वसुली झाली असून एक गाळ्यांची वसुली बाकी आहे. पीतांबर चव्हाण यांनी सर्वाधिक 98% वसुली केल्याने 11 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र जिल्हाधिकार्यांचा हस्ते दिले जाणार आहे. शिवाय पाणीपट्टी व घरपट्टी 80% वसुली करणारे वसुली विभागातील कर्मचारी सुनिल भारती व दिलीप कोळी यांना नगरपालिकेतर्फे पाच पाच हजार रुपये बक्षीस मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यातर्फे दिले जाणार आहे.