सर्वेक्षणाला विरोध मनपाचे पथक माघारी

0

जळगाव- कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तो वास्तव्यास असलेल्या परिसरात तपासणी अर्थात सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार जळगावातील ‘त्या’ रुग्णाच्या घराच्या आजूबाजूला सर्वेक्षण करण्यासाठी मनपाचे 17 पथक सकाळी 10 वाजेला गेले होते. मात्र येथील नागरिकांनी सहकार्य न करता विरोध केला. त्यामुळे मनपाचे पथक माघारी परतले.

जळगावातील ‘त्या’ कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या परिसरात मनपाचे पथक सर्वेक्षणासाठी गेले होते. त्या परिसरात तब्बल 14 दिवस सर्वेक्षण केले जाते. घरात किती लोकं आहेत. आज किती आहेत. एखादया घरात काल चार जण असतील आणि आज तीन जण हजर असेल तर तो आज कुठे गेला आहे अशीही विचारणा केली जाते. त्यासाठी मनपाचे 17 पथक ‘त्या’ परिसरात सर्वेक्षणासाठी गेले होते. मात्र परिसरातील नागरिकांनी सहकार्य न करता विरोध केला. त्यामुळे मनपाचे पथक माघारी परतले.