सर्वोच्च न्यायालयाकडून शिरपूर पं.स.च्या ८ गणांचे सदस्यत्व पद रद्द

शिरपूर। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत सदस्यपदांचे सामाजिक आरक्षण ५० टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने ओबीसी प्रवर्गात निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यात तालुक्यातील अर्थ, विखरण, तर्‍हाडी, वनावल, जातोडा, शिंगावे, करवंद, अजनाड अशा ८ पं.स. गणांच्या सदस्य पदांचा समावेश आहे. याठिकाणी लवकरच जनरल सदस्य पदासाठी निवड होणार आहे.
तालुक्यात रद्द झालेले ८ पं.स.च्या सदस्यात भाजपाचे अजनाड गणातील दर्यावरसिंग भिमसिंग जाधव, करवंद गणाचे वैशाली सुनील सोनवणे, वनावल गणाचे ममता ईश्वर चौधरी, तर्‍हाडी गणाचे प्रतिभा कैलास भामरे, विखरण गणाचे विनिता मोहन पाटील, अर्थे गणाचे शशिकांत माधवराव पाटील, जातोडा गणाचे विजय विश्वासराव पाटील अशा ७ भाजपाच्या सदस्यांचा समावेश तर रा.काँ.चे शिंगावे गणातील रामकृष्ण विठोबा महाजन अशा तालुक्यातील ८ गणांचे सदस्य पद रद्द झाले आहे.