नवी दिल्ली : अयोध्ये राम मंदिर उभारण्यावरुन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्या पद्धतीने मशिदीची वास्तू पाडण्यात आली. त्याचपद्धतीने मंदिर उभारले जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, अयोध्येत राम मंदिर उभारणारच असल्याचे साध्वी प्राची म्हणाल्या.
राम मंदिरप्रकरणी लवकर निकाल यावा यासाठी आम्ही या खटल्याच्या सुनावणीसाठी वेगळ्या खंडपीठाची मागणी केली होती. दीर्घकाळापासून आम्हाला फक्त तारखाच मिळत आहेत. आता सर्व हिंदू निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. आता संयम तुटत चालला आहे, असा इशाराही दिला.
अयोध्येत राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा जानेवारी २०१९ पर्यंत पुढे गेली आहे.