सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पाचोर्‍यात बट्याबोळ

0

पाचोरा । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण देशासहीत राज्यभरात राष्ट्रीय महामार्गापासून ते राज्यमहामार्गाच्या पाचशे मिटर अंतरावर असलेले देशी दारुचे दुकान, वाईन शॉप, बिअर शॉप तसेच बिअरबार दुकानमालकांची व विक्री करणार्‍यांचे थाबे दणाणले होते. परंतु 8 ते 15 दिवसानंतर पुन्हा महामार्गावरील दारु दुकाने सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा अवमान झाले असून निर्णयाचा पाचोर्‍यात बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील शॉपींग कॉम्पलेक्सच्या वरच्या मजल्यावर आहे. दुय्यम निरीक्षक म्हणून लिलाधर पाटील कार्यरत आहेत. मात्र दुय्यम निरीक्षक जास्त वेळ कार्यालयात थांबत नाही. त्यामुळे त्यांचा वचक दारु विक्रेत्यावर राहिलेला नाही. पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरुढ पुतळा आहे. हा पुतळा 1985-90 च्या दरम्यान तयार केलेला आहे. परंतु 10 ते 12 वर्षापूर्वी या चौकामध्ये ‘रिझाणी ब्रॅण्डी हाऊस’ या वाईन शॉपला राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिली. राजपुरुषाच्या पुतळ्याजवळ वाईन शॉपला परवानगी दिली कशी? या चौकामध्ये सर्व शासकीय कार्यालये, पोलिस स्टेशन, तहसिलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपालिका कार्यालय, आमदार यांचे कार्यालय आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी महिला वर्गाची या चौकामध्ये नेहमी वर्दळ असते.