नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात आज न्या.दिनेश माहेश्वरी आणि न्या.संजीव खन्ना यांनी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांना शपथ दिली.
सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या ३१ असते. न्या.दिनेश माहेश्वरी आणि न्या.संजीव खन्ना यांच्या नियुक्तीमुळे आता ही संख्या २८ वर पोहोचली आहे. न्या.माहेश्वरी कर्नाटक उच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या.ए.के.सीकरी, न्या.एस.ए.बोबडे, न्या.एन.वी.रमण आणि अरुण मिश्रा यांच्या समितीने १० जानेवारीला न्या.माहेश्वरी आणि न्या.खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती.