लंडन । जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करुनही भारताच्या गोविंदन लक्षणनला पुरूषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. 27 वर्षीय लक्षमणनने पहिल्या फेरीतील हीटमध्ये 13 मिनीट 35.69 सेकंद असा वैयक्तिक उच्चांक नोंदवला पण ही कामगिरी लक्श्मणनला अंतिम फेरीत स्थान मिळवून देऊ शकली नाही. या स्पर्धेत 31 व्या स्थानावर राहिलेल्या लक्श्मणने याआधी 13 मिनीटे 36.62 सेकंद अशी वेळ नोंदवली होती.
प्राथमिक फेरीत 15 वा क्रमांक मिळवणार्या लक्श्मणनच्या गटात ब्रिटनचा गतविजेता मो फराहचादेखील समावेश होता. प्राथमिक फेरीत फराह दुसर्या स्थानावर राहिला. फराहने 13 मिनीटं 30.18 सेकंद अशी वेळ नोंदवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. इथोपियाचा योमिफ केजेल्चाने 13 मिनीटे 30.07 सेकंद अशी वेळ नोंदवून प्राथमिक फेरीत पहिले स्थान मिळवले.
दोन प्राथमिक फेर्यांमध्ये आघाडीवरील पाच धावपटूंसह पाच वेगवान धावपटूंना या शर्यतीच्या अंतिम फेरीत जागा मिळाली.पुरूषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीय लक्श्मणन एकमेव भारतीय धावपटू होता. जगातील अव्वल धावपटूंसह धावताना सर्वोत्तम कामगिरी करुनही लक्श्मणनला अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. शर्यतीनंतर लक्श्मणन म्हणाला की, पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेत धावलो.स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यांचे माझे ध्येय होते पण मला वैयक्तिक उच्चांकावर समाधान मानावे लागले. पण अशी कामगिरी करुनसुद्धा अंतिम फेरीत सहभागी होणार नसल्याचे दु:ख आहे.पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम बहादूर प्रसादच्या नावावर आहे. बहादूरने 1992 मध्ये 13 मिनीटे 29.70 सेकंद असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. हा विक्रम आजतागायत कायम आहे.