सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता

0

भुसावळ । प्रत्येकाला सर्वोत्तम पाहिजे असत पण योगदान देतांना मात्र ते परीपूर्ण नसते त्यामुळे क्षमता असूनही यश मिळत नाही. ध्येय गाठण्याआधी नेमके काय व्ह्ययचे आणि मिळवायाचे हे निश्चित केल्याशिवाय स्वप्ने साकार होत नाहीत, यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वेलनेस फाऊंडेशनचे निलेश गोरे यांनी केले. हिंदूसभा न्यास संस्थेतर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन अहिल्यादेवी कन्या शाळेत सायंकाळी 5 वाजता करण्यात आले होते.

150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थित 150 मुलामुलींना यश मिळविण्याचे सूत्रे आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रेरणादायी धडे दिले. सोबतच पालकांनाही योग्य पालकत्व करण्याच्या टिप्स दिल्या व पालकांच्या करिअर विषयक शंकांचे निरसन केले. मार्गदर्शन करतांना निलेश गोरे म्हणाले, सर्वोत्तम बनायचे असेल तर प्रथम तशी मानसिकता बनवावी लागते आणि स्वतःमधील उणिवांना जो शोधतो, उणिवांना दूर करते तीच व्यक्ती उंची गाठते आणि उन्नते करते. थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा, उणीवा दूर करा नंतर निर्णय घ्या. आपण स्पर्धा करायची की गुणवत्ता प्राप्त करायची ते ठरवा कारण जसा निर्णय तशी कृती त्याचप्रमाणे निष्पत्ती असेही गोरे यांनी सांगितले.

अशा विविध पैलूंवर निलेश गोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात 150 मुलामुलींसह पालकही उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. मार्गदर्शन व्याख्यान झाल्यानंतर पालकांच्या पालकत्वाविषयीच्या शंकांचे निरसन निलेश गोरे यांनी केले. कार्यक्रमस अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. सूत्रसंचालन मधुकर वाणी यांनी केले तर जयसिंग पावरा यांनी आभार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनू मांडे यांनी विशेष मदत केली.