शाळेतुन २१६ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
जामनेर : सीबीएससी बोर्डाद्वारे घेण्यात येणार्या २०१८-१९ मध्ये सर्वोदया स्कॉलरशिप परीक्षेत येथील लार्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलची इ. दूसरी ची विद्यार्थिनीं विधी अर्पण लोढा हीने संपूर्ण भारतातून तृतीय स्थान मिळवित या शाळेसह तालुक्यातुन पहिली येण्याची मानकरी ठरली आहे.
भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी शालेय जीवना पासून सवय जडावी व अनुभवा मध्ये भर पडावी या हेतुने या परीक्षेची तयारी आता पासून करण्यासाठी मदत होत असते. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतांना सर्व पैलुंचा विचार करणे हेच शिक्षणाचे ध्येय आहे. बौद्धिक विकास करणे हा या स्पर्धा परीक्षांचा मुख्य उद्देश असतो. म्हणूनच आतापासून सर्वोदया परिक्षेच्या माध्यमातून तयारी करून विद्यार्थ्यांना गोडी लावली जाते. यंदा जामनेर येथील या शाळेतुन सुमारे २१६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन परीक्षा दिली होती. मात्र यात विधी अर्पण लोढा या विद्यार्थ्यांनीने देशातुन तृतीय स्थान मिळविला असुन ती तालुक्यातील पहीली विद्यार्थिनी ठरली आहे. संस्थेचे अध्यक्ष हेमंत ललवाणी, संस्थाचालक तसेच प्राचार्य धनंजय सिंग, उत्तमचंद लोढा, सुभाषचंद लोढा, अभय लोढा, अमोल लोढा, अजय लोढा, अर्पण लोढा तसेच परिवाराकडून विधीचे स्वागत केले आहे.
आईने करून घेतली तयारी
विधी लोढा ही या शाळेतील हुशार विद्यार्थिनी असून विशेष म्हणजे तिने आतापर्यंत कोणतीच ट्यूशन लावली नाही. ती स्वतः अभ्यास करते. तर विधीची आई आरती लोढा ही घरकाम करून मिळेल त्या वेळेत तिचा अभ्यास करून घेते. या यशाचे श्रेय आर्स आरती लोढा हिचे असल्याचे विधी हिने सांगितले. शाळेचे प्राचार्य धनंजय सिंग तसेच स्पर्धा विभाग प्रमुख दीपक राऊत, नोरेन सिंग व अमन पांडे, अंजली लोढा यांचे मार्गदर्शन लाभले.