मुंबई । अन्न आणि इतर सुविधा पसंत न आल्याने एका ग्राहकाने सर्व्हिस चार्ज रिटर्न मागितला पण रेस्टॉरंट मालकाने तो देण्यास साफ नकार दिला. यावरुन मोठा गदारोळ झाला. पण रेस्टॉरंटमालकाला याचा भुर्दंड भरावा लागला असल्याचे समोर आले आहे. हॉटेलमधील सुविधा न आवडल्याने ग्राहक आय.पी.एस अधिकारी जय जीत सिंह यांनी 181.5 एवढा सर्व्हिस रिटर्न मागितला. पण रेस्टॉरंट मालकाने तो देण्यास साफ नकार दर्शवला. याबाबत सिंह यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.
ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशानुसार ग्रील रेस्टॉरन्टला हा भूर्दंड भरावा लागला आहे. तर आयपीएस अधिकारी जय जीत सिंह यांना नुकसान भरपाई म्हणून 10,182 रुपये देण्याचा आदेश दिला. एप्रिल महिन्यापासून रेस्टॉरन्टच्या बीलवर सर्विस चार्ज आकारण हे पूर्णपणे स्वैच्छिक असून ते अनिवार्य नाही. या वर्षाच्या सुरुवातीला सिंह यांनी केंद्रीय जिल्हा ग्राहक मंचात 1810 रुपयांचे बील दिले, ज्यामध्ये 10 टक्के सर्व्हिस टॅक्स जोडला होता. बीलमध्ये दिल्याप्रमाणे अन्न आणि सुविधा त्यांना मिळाल्या नसल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यामूळे त्यांनी सर्व्हिस चार्ज रिटर्न मागितला. पण रिफायनान्स मॅनेजमेंट कंपनीच्या पॉलिसीचा संदर्भ देत त्यांनी सर्व्हिस चार्ज रिटर्न करण्यास नकार दिला. ’या घटनेनंतर मी कायद्याची मदत घेण्याचे ठरविले आणि ग्राहक मंचात जाऊन सर्व्हिस चार्ज संबधी दाद मागितली असे सिंह यांनी सांगितले.