सर्व आजारांसाठी होमिओपॅथी हे परिपूर्ण विज्ञान

0

जळगाव । सर्व आजारांसाठी होमिओपॅथी हे परिपूर्ण विज्ञान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.महेंद्र काबरा यांनी केले. सिव्हिल हॉस्पिटलच्या आयुष-होमिओपॅथिक विभाग तर्फे होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हेनिम यांच्या 262 वी जयंती निमित्ताने जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मनोहर बावने , वैद्यकीय अधिकारी डॉ.बडगुजर मॅडम, इंचार्ज सिस्टर सौ.जावळे, सहायक आयुष अधिकारी मोईन फारुकी उपस्थित होते.या वेळी बोलताना डॉ.काबरा यांनी डॉ.हेनिमन आणी होमिओपॅथी बद्दल सखोल माहिती दिली व मार्गदर्शन केले.

मतिमंद मुलांना करण्यात येणार मार्गदर्शन
नवीन पिढीने सामाजिक भान ठेवून, रुग्णांची योग्य ती सेवा केली पाहिजे असेही काबरा यांनी सांगीतले. डॉ.मनोहर बावने यांनी ,आज आयुष विभाग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आहे. यामाध्यमातून दर्जेदार सेवा देण्यात येत आहेत. आता जिल्हा रुग्णालयात आयुष विभाग तर्फे महिन्याचा दर दुसर्‍या गुरुवारी गतिमंद व मंदिमंद मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक मार्गदर्शन,औषध व उपचार करण्यात येणार असल्याचेही डॉ. बावने यांनी सांगीतले.

कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाला शहरातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स उपस्थित होते. डॉ.तृप्ती बढे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. रवि हिरानी यांनी मानले. डॉ. मोईन फारुकी, डॉ. माधुरी फालक, डॉ संदीप महाजन, डॉ.जहाँ आरा, अनंत महाजन, संगीता पाटिल, हरीश येवले व सिव्हिल स्टाफ यांनी सहकार्य केले.