सर्व आलबेल तरी सायकल स्वारी कशासाठी?

0

कोल्हापूर । टाळ-मृदुंगाचा जयघोष, विठू नामाचा गजर आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो वारकर्‍यांचा सहभाग असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यावर्षी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची ‘सायकल वारी’ सहभागी होत आहे. शत्तकोत्तर परंपरा असलेल्या या वारीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना बंदोबस्त व सुविधा पाहणीच्या नावाखाली काढण्यात येणारी ही ‘सायकल वारी’ मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.
यंदाच्या वारीमध्ये सुरक्षा, अंमलबजावणी आणि नियोजन याचा आढावा घेणारी सायकल वारी पोलीस दलाच्या वतीने काढण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील स्वतः आळंदी ते पंढरपूर सायकल वारी करणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. वारीच्या दोन दिवस अगोदर पोलीस अधिकारी, कर्मचारी, आणि सामजिक संस्थेचे प्रतिनिधी वारीच्या मार्गावर सायकल वारी काढणार आहेत. या माध्यमातून सुरक्षात्मक उपाय योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. वारकर्‍यांना होणारा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने ही सायकल वारी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर परिक्षेत्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि मुख्य रस्त्यांवर आता हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करणार येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

बदोबस्त की सायकल वारीची बडदास्त
नांगरे-पाटील यांच्यासह 200 तरूण या वारीत सहभागी होणार आहेत. आळंदी ते पंढरपूर अशी सहा दिवसाची ही वारी असेल. वारकर्‍यांची वारी पोहचण्यापूर्वी ही वारी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचून तेथील सोयी सुविधांची पाहणी करणार आहे. या वारीत त्या त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांसह महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्ताने एखाद्या यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. मुळात या वारीत कुणाचा खिसा कापला, दागिने हरवले असा प्रकारही कधी ऐकलेला नाही. पण पोलिसांनी वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करायचा की या सायकल वारीची बडदास्त करायची असा दुहेरी प्रश्‍न पडला आहे.

पंढरपूरच्या या वारीत दरवर्षी दहा लाखाहून अधिक वारकरी सहभागी होतात. यावर्षी 16 व 17 जूनला वारकर्‍यांच्या दिंड्या प्रस्थान करणार आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाची व इतर सुविधांची ठिकाणे ठरलेली आहेत. वर्षानुवर्षे त्यात कोणताही बदल नाही की खंड नाही. सर्व काही अलबेल असताना या सायकल वारीच्या निमित्ताने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

सीसीटीव्ही बसवणार
टाळ-मृदुंगाचा जयघोष, विठू नामाचा गजर आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो वारकर्‍यांचा सहभाग असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यावर्षी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची मसायकल वारीफ सहभागी होत आहे. शत्तकोत्तर परंपरा असलेल्या या वारीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना बंदोबस्त व सुविधा पाहणीच्या नावाखाली काढण्यात येणारी ही मसायकल वारीफ मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. वारीच्या मार्गावर दिंड्यांचा मुक्काम ज्या गावांत किंवा मैदानावर असेल त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. मार्गावरील काही नगरपालिकांनी याची जबाबदारी घेतली आहे. सायकल वारीत पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सहभागी होतील. त्यामुळे मूळ दिंडीपेक्षा या सायकल वारीच्या बडदास्तीसाठी यंत्रणेला झटावे लागणार आहे.