भुसावळ । जगात जितके धर्म आहे त्या प्रत्येक धर्मात तीनच जगाची कल्पना आहे ते म्हणजे पृथ्वी, आकाश, पाताळ म्हणजेच सर्वधर्म एकच शिकवण देतात. भूगोल शास्त्राचा विकास चिकित्सेतून झाला आहे. सर्वच धर्म शांततेचा व सलोखा राखण्याचा मार्ग दाखवितात. तुम्ही कोणत्या धर्माचे आहे हे महत्वाचे नसून प्रत्येक धर्मात सांगितलेली शिकवण महत्वाची आहे. हेे जाणून घेत त्याचेे आचरण करण्याचे आवाहन प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले. नाहाटा महाविद्यालयात 16 रोजी पासून भुगोल सप्हात सुरु होता. शनिवार 21 रोजी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. समारोपकर्ते म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्रा. देवेंद्र इंगळे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, व्यासपीठावर प्रा. ई.जी. नेहेते, प्रा. व्ही.डी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एम.आर. संदानशिव, प्रा. बी.डी. चौधरी, प्रा. जी.पी. पाटील, प्रा. व्ही.जी. कोचुरे, प्रा. पी.एच. इंगोले उपस्थित होते.
भारतात खर्या अर्थाने लोकशाहीचे राज्य
प्रा. इंगळे यांनी धर्म व सामाजिक सलोखा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, कोणताही धर्म दुसर्या धर्माचे आचरण करण्यास अस्पृश्य मानत नाही. भारतात सर्वच धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात म्हणून भारत हा खर्या अर्थाने लोकशाही प्रधान देश आहे, असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्या वायकोळे यांनी सांगिले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे माणुसकी. माणुसकीने वागणे हाच धर्म मानणे ही शिकवण या सप्ताहातून विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी पोष्टर प्रदर्शन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. सुत्रसंचालन दुर्गा बडगुजर, प्रास्ताविक माधुरी तायडे, पाहुण्यांचा परिचय तेजस्विनी वाणी तर आभार प्रा. अनिल हिवाळे व भुपेंद्र बाणाईत यांनी मानले. विभागप्रमुख प्रा. व्ही.पी. लढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनिल हिवाळे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. अजय तायडे, प्रा. उषा कोळी, प्रविण पवार, नंदलाल घ्यार, योगिता खाचणे यांनी परिश्रम घेतले.