सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा व्यवस्थापन सदस्य प्रशिक्षण

0

कासारे । सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षण व शाळाभेटीचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्‍वभूमीवर बोडकीखडी ता.साक्री येथील जि.प.प्राथमिक केंद्र शाळेत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणावर्गाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख एस.पी.बैसाणे होते तर बोडकीखडी – खांबपाडा गृप ग्रा.पं.सरपंच यशवंत बागुल यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने उद्घाटन झाले. यावेळी साधनव्यक्ती शालीग्राम बच्छाव, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर उपस्थित होते.

शाळेच्या विकासाच्या मुद्द्यावर लक्ष
शाळेच्या गुणवत्ता वाढीबरोबर डिजीटल शाळा, वृक्षारोपण, हगणदारीमुक्त गाव या विविध उपक्रमातील शाळांचा सहभाग यासंबंधी देखरेख करण्यासाठी प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या सदस्यांनी नेमके काये करावे, शाळेचा विकास होण्यासाठी लक्ष पुरविण्यासंबंधी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी बोडकीखडी, खांबापाडा, मालनगाव, डुक्करझिरा, काभरी येथील समिती सदस्य उपस्थित होते. यात लक्ष्मण गवळी, पांडूरंग गायकवाड, कौतिक गायकवाड व इतर सदस्य उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गास केंद्रप्रमुख एस.सी.बैसाणे, पी.झेड.कुवर यांनी मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.आर.कोतकर यांनी केले. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन श्रीमती अहिरे, मालनगावच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम, उज्वला नेरकर, राजश्री पाटील, ठाकरे, संजय वाघ यांनी केले.