मुंबई । युवा खेळाडूच्या मागे ठामपणे उभा राहणार माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघात आणले.त्यावेळेस जडेजा हा धोनीच्या नेतृत्वात असलेल्या चेन्नई सुपर किंग्स या संघात खेळत होता. मात्र आलोचकांना संधी मिळाल्याने त्यांनी चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकारी असल्याने माहीने संधी दिली.असे आरोप केले गेले.असे आरोप होत असतांना जडेजाने त्याची गुणवत्ता फलंदाजीत व गोलंदाजीत सिध्द करून दाखविली व आलोचकांचे तोड बंद केले.त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात असलेल्या संघात रविद्र जडेजाच्या नावापुढे ‘सर ’पदवी लागली त्यानंतर सर जडेजा यांने क्रिकेटच्या ज्याही फॉरर्मन्ट खेळण्याची संधी मिळाली त्या फॉरर्मन्टमध्ये आपली योग्यता सिध्द केली आणि तो ‘सर’ पदाचा खरोखर लायक आहे हे दाखवून दिले.
रविंद्र जडेजाला भारतीय कसोटी संघात स्थान दिल्यानंतर तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पण धोनीने जडेजाच्या निवडीवर ठाम राहून त्याच्या पाठिशी उभा राहिला. जडेजानेही संघातील आपली योग्यता सिद्ध करून टीकाकारांची तोंडं बंद केली.‘सर जडेजा ’ याने आपल्या गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या अष्टपैलू कामगिरीतून करून दाखविली. सर जडेजा यांनी गेल्या सहा महिन्यांच्या कामगिरीत कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले. तर कसोटी संघात त्याने आपले स्थान पक्के करून दाखवले.संघातील स्थान तर पक्के केलेच मात्र तो खरोखर सर आहे हे दाखवून दिले. रांची कसोटीतही जडेजाने अफलातून कामगिरी केली आणि भारताच्या विजयाच्या आशा जागृत ठेवल्या होत्या. रांची कसोटीत अनिर्णीत राहिली. सामनावीराचा पुरस्कार जडेजाला मिळाला नसला तरी भारतीय संघाला फिरकी गोलंदाजीतला नवा हिरो सापडला. रांची कसोटीमधला सर्वोत्तम फिरकीपटूम्हणून जडेजाचे नाव घेतले गेले.
जडेजाचे पुन्हा नामकरण
मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळीने भारतीय संघाला सहाशेचा आकडा देखील गाठता आला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही जडेजाचे पत्रकार परिषदेत तोंड भरून कौतुक केले.त्याच्या नावापुढे सर या पदवी बरोबर अजुन एक पदवी जोडली गेली.किवा त्याचे पुन्हा नामकरण करण्यात आले आहे.‘सर जडेजा’ एवजी ’बॉलिंग मशिन’ असे नामकरण कसोटी कर्णधार विराट कोहली याने केले आहे. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघ आज धर्मशालाला रवाना झाला. कोहलीने धर्मशालासाठी रवाना होतानाचा जडेजा सोबतचा एक सेल्फी ट्विट करून ट्विटमध्ये जडेजाचे नामकरण केले आहे. धोनीच्या कर्णधारी काळात जडेजाला ‘सर’ ही पदवी देण्यात आली होती. धोनीसह संघातील प्रत्येकजण ‘सर जडेजा’ म्हणतात. तर धावांची टांकसाळ उघडणा़र्या कोहलीला ‘रन मशिन’ असे नाव देण्यात आले होते. या आता ‘रन मशिन’ कोहलीने कसोटीतील अव्वल मानांकित जडेजाला ‘बॉलिंग मशिन’ असे नाव दिले आहे.