जळगाव । येथील सर सैय्यद खॉ लायब्ररी अक्सानगर, मेहरुण संचलित सार्वजनिक वाचनालय व उद्यानाचे भूमीपूजन कुराण पठणाने करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक इकबाल वजारी यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
अध्यक्षस्थानी इंजिनियर साजिद शेख, प्रमुख पाहुणे गनी मेमन, नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे, नगरसेवक अनिल देशमुख, निलेश झोपे, प्रशांत नाईक, अयाज अली, रहीम शेख, जामनेर, शेरा, नासिर व रईस उपस्थित होते. सुत्रसंचालन अशफाक पिंजारी यांनी तर आभार जहाँगीर ए खान यांनी मानले. इद्रीस शेख, डॉ. अल्तमश, याकुब मुलतानी, सैय्यद आबीद अली, राजू पिंजारी, रहीम पटेल, अकील मन्यार, मोहसिन खान, अनिस मोहम्मद खान यांनी परिश्रम घेतले.