दिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात 611 रूग्ण आढळून आले असुन 11 रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ४4 हजार 983 झाली आहे. सर्वाधिक 144 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे 809 रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत.

जिल्ह्यात नव्याने 611 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर 144, जळगाव ग्रामीण 21, भुसावळ 95, अमळनेर 37, चोपडा ५8 , पाचोरा 16, भडगाव 15, धरणगाव 33, यावल 18, एरंडोल 22, जामनेर 33, रावेर 6, पारोळा 60, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 12, बोदवड 11 इतर जिल्ह्यातील 7 याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, भुसावळ तालुक्यात प्रत्येकी 3, चोपडा, यावल तालुक्यात प्रत्येकी 2 , पाचोरा तालुक्यात एक बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.