मुंबई । वित्तीय वर्ष 2017-18, 2018-19 व 2019-20 या वषार्र्साठी विनामीटर ग्राहकांसाठी अनुक्रमे 10.92 टक्के, 16.80 टक्के आणि 33.12 टक्के इतकी वीज दरवाढ आहे. तसेच मीटर असलेल्या ग्राहकांसाठी याच वर्षांसाठी अनुक्रमे 7.80 टक्के, 11.51 टक्के आणि 16.11 टक्केएवढी वीज दरवाढ असल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. अशा प्रकारे ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेने सलग तीन वर्षे सर्वसामान्यांना विजेचे धक्के बसणार आहेत.
राजेश काशीवार यांच्यासह आठ सदस्यांनी कृषिपंप वीज दरवाढीबाबत प्रश्न विचारला होता. लेखी उत्तरात ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, वीज दरवाढ ठरवण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास आहेत. आयोगाने 3 नोव्हेंबर 2016 च्या वीज दर आदेशान्वये 1 नोव्हेंबर 2016 पासून नवीन वीज दर लागू केले आहेत. सन 2015च्या तुलनेत नवीन वीज दरवाढ टक्केवारी विनामीटर ग्राहक 23.68 टक्के ते 50.36 टक्केइतकी आहे, तर मीटर असलेल्या वीज ग्राहकांना 42.3 टक्के ते 65.45 टक्के एवढी आहे, असेही या उत्तरात ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्षांनी डिसेंबर 2016 मध्ये केले हे खरे असल्याचेही मान्य करतानाच विहित प्रक्रियेनुसार सरंवल संबंधितांचे म्हणणे विचारात घेऊन महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाने सदरचे नवीन वीज दर निश्चित केले असेही ऊर्जामंत्री बाावनकुळे यांनी या लेखी उत्तरात म्हटले आहे.