सलग दुसर्‍यांदा सुनीत जाधवला भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत यश

0

गुरूग्राम । भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा सुनीत जाधवने बाजी मारून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सुनीतने क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या भारत श्रीच्या अंतिम फेरीत संभाव्य विजेत्या राम निवास, जावेद अली खान, बी. महेश्वरन आणि सर्बो सिंगला धक्का देत उपस्थित 20 हजार क्रीडाप्रेमींच्या साक्षीने भारत श्रीवर दुसर्‍यांदा आपला कब्जा जमवला. गेल्याच आठवड्यात सलग चौथ्यांदा सुनीतने ‘महाराष्ट्र श्री’वरही कब्जा केला होता.

महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत मणिपूरच्या सरिता थिंगबैजम सलग दुसर्‍यांदा ‘मिस इंडिया’चा बहुमान पटकावला तर फिजीक स्पोर्टस् प्रकारात संजना आणि सुमीत बॅनर्जीने सुवर्ण यश मिळवले.तर देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंची गुरगावकरांनी
मने जिंकली.