नवी दिल्ली :- गेल्या मे महिन्यामध्ये सलग १६ दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सर्वसामान्य त्रस्त झाला होता. त्यानंतर आज पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये सलग सातव्या दिवशी पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. तर देशात सर्वाधिक दर हे मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 85.65 आणि डिझेल 73.33 रुपये प्रती लीटर झाले आहे. 29 मे पासून पेट्रोलचे दर 63 पैसे आणि डिझेल 46 पैशांनी कमी झाले आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे दर ७७.८३, चेन्नईत ८०.८०, कोलकाता ८०.८७ तर चंदिगढमध्ये ७४.८५ आहे. सलग १६ दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने वाढ झाली होती त्यानुसार इंधनच्या किंमती कमी होताना दिसत नाही आहे.