सलग १३ व्या दिवशी पेट्रोल स्वस्त; पहा आजचे दर

0

नवी दिली- पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत आज सोमवार १३ व्या दिवशी घसरण कायम राहिली. आज पेट्रोल २१ तर डीझेल १६ पैशांनी कमी झाले आहे. मुंबईत २० पैसे पेट्रोल कमी झाले आहे. १३ दिवसात एकूण १ रुपये ८६ पैशांनी पेट्रोल कमी झाले आहे. तर डीझेल १ रुपये ३७ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोल २४ तर डीझेल १८ पैशांनी स्वस्त झाले होते. आता दिल्लीत पेट्रोल ७६.५८ रुपये तर डीझेल ६७.९५ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ८४.४१ रुपये तर डीझेल ७२.३५ रुपये प्रती लिटर आहे.

देशातील ४ महानगरातील नवीन पेट्रोल दर
दिल्ली ७६.५८ रुपये, कोलकाता ७९.४४ रुपये, मुंबई ८४.४१ रुपये, चेन्नई ७९.४८ रुपये हे आजचे दर आहे. तर डिझेलचे दर दिल्ली ६७.९५ रुपये, कोलकाता ७०.५० रुपये, मुंबई ७२.३५ रुपये, चेन्नई ७१.७३ रुपये दर आहे.