मुंबई : सुपरस्टार सलमान खान अनेकांसाठी ‘गॉड फादर’ आहे. बॉलीवूडमध्ये त्याला भाईजान, दबंग स्टार अश्या नावानेही ओळखले जाते. मात्र, लहानपणी हाच सलमान खूप खोडकर होता. त्याच्या लहाणपणीचा एक किस्सा त्याचे वडील सलीम खान यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये सलीम खान, सलमान खान आणि सोहेल खान हे येऊन गेले. यावेळी सलीम खान यांनी सलमानच्या बालपणाची एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले, की सलमानच्या खोडकरपणामुळे त्याला सतत वर्गाबाहेर काढून टाकण्यात येत असे. शाळेच्या परीक्षेदरम्यानही त्याने पेपर लीक केले होते. आमच्या घरी एक गणेश नावाचा व्यक्ती नेहमी येत असे. तो घरी आला की सलमान त्याची खूप खातिरदारी करत असे. ही गोष्ट लक्षात आल्यावर आम्ही त्या व्यक्तीची माहिती काढली. तो व्यक्ती सलमानचाच शिक्षक होता. तो सलमानला परिक्षेपूर्वीच पेपर घरी आणून देत होता, असे सलीम खान यांनी सांगितले.