सलमानला जीवे मारण्याची धमकी

0

जोधपूर : राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका उद्योगपतीच्या हत्येच्या आरोपाखाली बिष्णोईला शुक्रवारी जोधपूर जिल्हा कोर्टापुढे हजर करण्यात आले असता त्याने सलमान खानला मारण्याची धमकी दिली.

सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार, असेही बिष्णोई म्हणाला. या धमकीचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जात असला तरी खरे कारण समजू शकलेले नाही. बिष्णोईवर खूनाचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा प्रकारचे 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. जोधपूर पोलिसांनी बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. सलमानला आवश्यक तेव्हा पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असे पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी स्पष्ट केले आहे.