सलमानवर जॅकलिन नाराज

0

मुंबई: प्रियांकाच्या एक्सिट नंतर कतरीना कैफने “भारत” या चित्रपटात एन्ट्री मारली आहे. ‘भारत’ मधील कॅटरिनाच्या एन्ट्रीने सलमान खान आणि चाहते दोन्हीही जाम खूश आहेत. पण एक व्यक्ति मात्र यामुळे दुखावलीयं. ही व्यक्ती कोण तर सलमानची ‘रेस3’ची हिरोईन, जॅकलिन फर्नांडिस़.

अलीकडे झालेल्या सलमानच्या दबंग टूरमध्येही जॅक सहभागी झाली होती. पण सलमानच्या मनात ‘सुंदर सुशील’ कॅट पक्की बसली होती. त्यामुळे प्रियांका एक्सिट होताच, ‘भारत’मध्ये ताबडतोब कॅटची वर्णी लागली.

‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे