मुंबई : बॉलीवुडचा चुलबुल पांडे सलमान खान त्याच्या अफेअर आणि लग्नाच्या बातम्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. दरवेळेस कोणत्या तरी नव्या अभिनेत्रीचं नाव सलमानशी जोडताना दिसतं. पण सलमान काही स्वत:हून आपल्या लग्नाविषयी सांगताना दिसत नाही. असं असलं तरी सलमानशी लग्न व्हाव अशी इच्छा असणाऱ्या तरुणींची संख्याही काही कमी नाहीए. त्यात आता आणखी एका तरुणींची भर पडली आहे.
उत्तराखंडवरुन एक तरुणी थेट मुंबईत त्याच्या घरी पोहोचली सलमानशी लग्न करण्याच्या इच्छेने. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेरच रोखल त्यामुळे सलमानची आणि तिची भेट काही होऊ शकली नाही.
या मुलीला इस्टर्न एक्सप्रेस वे वर विना कारण फिरताना पाहिलं गेलं आणि यासंदर्भात पोलिसांतही कळवण्यात आलं. दुसऱ्यादिवशी पहाटे पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची तपासणी केली आणि तिच्या घरातल्यांपर्यंत पोहोचविण्यात आलं. या मुलीचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचे डॉक्टरांच्या अहवालात समोर आलं.