सलमानसोबतच्या रिलेशनबद्दल शिल्पाचा खुलासा

0

मुंबई : सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या मैत्री बद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र कामही केले. मात्र, यांची फ्रेंडशिप पाहता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सगळेजण म्हणत होते.

नुकतीच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शिल्पाने सलमानसोबतच्या आपल्या रिलेशन बद्दल खुलासा केला आहे. सलमान आणि मी केवळ चांगले मित्र असून यापेक्षा जास्त आमच्यात काहीच काडी न्हवतं हे तिने स्पष्ट सांगितले.

शिल्पाच्या वडिलांसोबतही सलमानचे चांगले संबंध होते. अनेक तास तो त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचा. पुढे शिल्पा म्हणाली, जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा सलमान खूप निराश होता. त्यांनतरही तो माझ्या घरी आला आणि फक्त शांत बसला. याशिवाय सलमान आणि माझ्यात इतर काहीही नाते नसल्याचेही तिने स्पष्ट केले.