सलमान अली ठरला ‘इंडियन आयडॉल १०’ चा विजेता

0

मुंबई : भारताचा आवडता शो ‘इंडियन आयडॉल’चा प्रत्येक सीजन चर्चेत असतो. अभिजीत सावंत पहिला इंडियन आयडॉल झाला होता. आता सलमान अली इंडियन आयडॉलच्या १० व्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

अंतिम फेरीत सलमानने नितीन कुमार, अंकुश भारद्वाज, नीलांजना रे आणि विभोर पाराशर या चौघांना मात देत ट्रॉफी आपल्या नावावर केली. इंडियन आयडॉलच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ हे कलाकारही उपस्थित होते.