मुंबई – ‘यमला पगला दिवाना फिर से’ या चित्रपटामध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि रेखा रफ्ता रफ्ता’ या गाण्यावर थिरकणार आहेत.रफ्ता रफ्ता हे धर्मेंद्र यांचे एक प्रसिद्ध गाणे आहे. ते या चित्रपटासाठी नव्याने तयार करण्यात आले आहे.
माझे किंवा माझ्या कुटुंबाचे चांगले कर्म असावे, फिल्म इंडस्ट्रीमधील कोणालाही बोलावले असता ते माझ्यासाठी हजर होतात, मला कोणाची गरज असते तेव्हा पूर्ण इंडस्ट्री माझ्या मदतीसाठी हजर असते असे धर्मेंद्र एका मुलाखतीत म्हणाले. सलमान हा एक चांगला व्यक्ती असुन मला तो आवडतो. तसेच सोनाक्षी सिन्हा ही माझ्या मुलीसारखी असल्याचे ते म्हणाले. रेखा ही माझी जुनी मैत्रीण असुन अनेक चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केले आहे, असे त्यांनी सांगितले