मुंबई : बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याने अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यास मदत केली आहे. अलिकडेच त्याने त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलीवूडमध्ये लाँच केलं. तर,दुसरीकडे मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन हिलाही तो लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. आता तो महेश मांजरेकरची मुलगी अश्वमी मांजरेकरला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणार आहे.
सलमान आणि महेश मांजरेकर यांची मैत्री खूप वर्षांपासूनची आहे.