पुणे: बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानचा केदार जाधव मोठा चाहता आहे. तो सलमानच्या स्टाईलही कॉपी करतो. केदारची मोठी बहिण चारुशीला हनुमंत पाटील यांनी ही माहिती दिली. केदारचे सध्या मोठे चाहते झाले आहेत मात्र तो स्वत: सलमानचा मोठा चाहता आहे. केदारने सलमानचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. सलमानच्या प्रत्येक चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला केदार हजेरी लावतो, असे त्या म्हणाल्या.
केदार जाधवचे हे सलमान खान प्रेम झिम्बाब्वेमध्ये झालेल्या मालिके दरम्यान जगजाहीर झाले. केदारने या मालिकेतील सामन्यानंतर मैदानावर सलमान खानचा दबंग स्टाईलने डान्स केला होता. सलमानच्या चित्रपटांचे मोठे कलेक्शन केदारजवळ आहे आणि जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा तो हे चित्रपट पाहतो. तसेच त्याच्या मोबाईलमध्येही जितकी बॉलीवूडची गाणी आहेत त्यात सर्वाधिक गाणी सलमानच्या चित्रपटातील आहेत. ही सर्व माहिती केदारच्या बहिणीने एका वेबसाईटला दिली आहे.