सलमान खानला दणका: कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

मुंबई-अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुझफ्फरपूर येथील न्यायालयाने सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा सलमानवर आरोप आहे.

६ सप्टेंबर रोजी वकील सुधीर ओझा यांनी सलमान खानच्या बॅनरखाली रिलीज होणारा चित्रपट ‘लवरात्री’वरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सलमान खान प्रॉडक्शन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्रपटाच्या शीर्षकावमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

अशा प्रकारचे चित्रपट बनवून हिंदू समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदूंचा नवरात्रोत्सव ज्यावेळी सुरू होणार आहे. त्याचवेळी हा चित्रपट रिलीज केला जात असल्याचे ओझा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चित्रपटात अश्लिलता आणि भावना दुखावण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. आता याप्रकरणी मुझफ्फरपूरच्या न्यायालयाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.