सल्लागारांसाठी 13 कोटींचा निधी मान्य

0

पिंपरी : शहरातील उर्वरीत 60 टक्के भागातही केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्याच्या कामास आता वेग येणार आहे. हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली. या सल्लागाराला 12 कोटी 97 लाख रूपये देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखाच्या घरात आहे. नव्याने नळजोड दिलेल्या ग्राहकांची संख्या सुमारे 10 हजार इतकी वाढून सदनिकांची संख्या 90 हजार इतकी वाढली आहे. सन 2016-17 या वर्षात सरासरी 450 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होतो. महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम अंतर्गत शहरातील 40 टक्के भागात 24 बाय 7 ही योजना राबविली जात आहे. या प्रकल्पाचा खर्च 207 कोटी रूपये इतका आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून 25 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.