‘सवाई’ला जीएसटीचा फटका

0

पुणे । पुणेकरांच्या मनाचा ठाव घेणार्‍या सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाला जीएसटीचा फटका बसणार आहे. तब्बल 28 टक्के इतका जीएसटी आकारण्यात आला आहे. हा कर हटविण्यात यावा, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.केंद्र सरकारने लक्झ्युरियम विभागात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा समावेश केला आहे. त्यामुळे 250 पेक्षा जास्त तिकीट असणार्‍या कार्यक्रमांच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. या करामुळे सर्वसामान्य रसिकांना कमी किंमतीत तिकीट घेता येणार नाही. याचा फटका संपूर्ण कार्यक्रमाला बसणार आहे. शिवाय हा महोत्सव देशभरात प्रसिद्ध असून पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

प्रायोजकांनीही फिरवली पाठ
नोटाबंदीनतंर प्रायोजकांनीही या महोत्सवाकडे पाठ फिरविल्याने कार्यक्रम आयोजित करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या 28 टक्के जीएसटीमुळे आता अडचण निर्माण झाली आहे. सरकारने तो कर रद्द करावा, अशी मागणी श्रीनिवास जोशी यांनी केली आहे. जीएसटी बाबतीत जोशी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये गाणेही यावेळी सादर केले.