सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चाळीसगावच्या विवेक सोनार यांना सादरीकरणाची संधी !

0

चाळीसगाव-सवाई गंधर्व महोत्सव कलाकारांसाठी तसेच रसिकांसाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील “पंढरी” मानली जाते. अगदी दूर दूर वरुन रसिक श्रोता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला पुण्याला जातात. भारतातील प्रत्येक कलाकारांसाठी अत्यंत मानाचा समजला जाणारा हा उत्सव यंदा खान्देसासाठी अधिक अभीमानाचा आहे. चाळीसगावचा भूमिपुत्र तथा जागतिक कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे पट्ट शिष्य पंडित विवेक सोनार यांना आपली कला या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळाली आहे. पंडित विवेक सोनार सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण करणारे खान्देशातीलचे पहिले कलाकार ठरणार आहे.

१५ डिसेंबर रोजी सादरीकरण
शनिवारी १५ डिसेबर रोजी बासरी वादन सादर करणार आहेत. यावेळी त्यांना पं.भवानी शंकर पखवाज वर तर पं.रामदास पळसुले तबल्यावर साथ देणार आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कलाकारांसाठी अभिजात शास्त्रीय संगीत सादर करण्याची संधी मिळावी हा मुळातच बहुमान आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी कसलेले कलाकार हेच श्रोते म्हणून उपस्थित राहत असल्याने या व्यासपीठावर प्रत्येक कलाकार आपली सर्वोच्च कला सादर करण्यासाठी धडपड करतो असे विवेक सोनार यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.

सवाई  महोत्सवसंगीताची “पंढरी”
१२  डिसेम्बर रोजी पुण्यात  सुरु होणाऱ्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार कला सादर करणार आहेत. हा महोत्सव हा देशातील सर्वोच्च कला संगीत व्यासपीठ म्हणून ओळखले जाते कवी कालिदास संगीत महोत्सव  सप्तक कला महोत्सव तसेच पंजाबमध्ये होणारा हरीवल्लभ कला संगीत महोत्सव अशी मोजकीच संगीत महोत्सव आयोजित होतात. यात पुण्याचा हा महोत्सवाला भारतात आदराचे स्थान आहे येथे कला सादर करायला मिळावी हे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते या अनुषंगाने चाळीसगावचा बासरी वादक  विवेक सोनार यांना ही संधी मिळत असल्याने समस्त खान्देश वासियांचे लक्ष आगामी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाकडे लागले आहे.