सव्वादोन लाखांत फसवणूक

0

धुळे । वीजमीटरचे रीडिंग कमी दाखवून वीज वितरण कंपनीची दोन लाख 14 हजार 370 रुपयांची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात शहरापासून जवळ असलेल्या गरताड येथील एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण उपविभागाचे अभियंता सतीश महाजन यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्ष ग्राहकांनी वापरलेल्या युनिटपेक्षा 21 हजार 437 युनिट कमी दाखविले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भादंवि कलम 420, 465 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तपास हेडकॉन्स्टेबल पी.एम. चव्हाण करीत आहेत.