सव्वालाखांची दारू जप्त

0

नारायणगाव : कांदळी गावाच्या हद्दीतून देशी-विदेशी दारू आणि एक दुचाकी असा 1 लाख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल छापा टाकून जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिली. 14 नंबर ते भोरवाडी जाणार्‍या रस्त्यालगत अजित नबाजी कुतळ (34) हॉटेल दीपाली बिअर बारमध्ये बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती घोडे यांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक राहुल गोंधे आणि त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी कुतळ मोटारसायकल लावून डीकीमध्ये दारूच्या बाटल्यांचा साठा करून चोरून विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याजवळील देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि दुचाकी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.