शहादा । शहादा शहरात विविध विकास कामांना सुरूवात झाली आहे. सुमारे एक कोटी दहा लाख खर्च रस्ते काँक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. हिना गावीत व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिमाय अंतर्गत विविध रस्ते कामांना सुरूवात झाली.
कामांना सुरूवात झाल्याने समाधान
प्रभाग तीन मधील श्रीराम कॉलनी अंतर्गत 37 लाख 71 हजार रूपये खर्चाचे रस्ते काँक्रेटीकरण, साईड गटार काम, तसेच खेतिया रोड नजिक पाण्याची टाकी व मेन रोड ते कुकडेल तर आझाद चौक पर्यंत 70 लाख रूपये खर्चाचे रस्ते काँक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन खा. हिना गावीत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, नगरसेविका योगिता वाल्हे, कांतीलाल टाटीया, संतोष वाल्हे, अशोक पाटील, हर्शल पाटील तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पालिका निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे एक कोटी दहा लाख खर्चाचा विकास कामांना सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.