सव्वा कोटी गरीब कुटुंबांना सरकारने वाऱ्यावर सोडले?

0
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा सवाल
मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आयुष्मान भारत योजनेवरून सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ सप्टेंबर रोजी देशातील जनतेसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना सुरू केली आहे.  आयुष्मान भारत योजनेमध्ये राज्यातील केवळ ८४ लाख कुटुंब नोंदणीकृत आहेत. उर्वरित सव्वा कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारला केला आहे.
ही योजना पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी सर्व राज्यामध्ये लागू होणार आहे. या योजनेनुसार १० कोटी कुटुंबातील ५० कोटी लोकांना एका वर्षात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. या योजनेमध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी, लिवरचे आजार, डायबेटीस यासह १३०० आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातही गरीब लोक उपचार घेऊ शकतील.