नगरसेवक पिंटू ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ- शहरातील प्रभाग 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी प्रभागातील सुमारे 400 रहिवाशांना अवघ्या सव्वा रुपयात गणेश मूर्ती उपलब्ध करून दिली. वांजोळा रोडवरील श्रीहरी नगरातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. नगरसेविका शोभा नेमाडे अध्यक्षस्थानी होत्या. बुधवारी दुपारी वांजोळा रोडवरील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात श्री मूर्तीचे वितरण करण्यात आले. सामाजिक उपक्रम आणि घराघरात गणरायाची स्थापना व्हावी म्हणून आपण सव्वा रुपयात मूर्ती दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक महेद्रसिंग ठाकूर, शोभा नेमाडे, दिनेश नेमाडे यांच्याहस्ते मूर्तीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मनीष भंगाळे, सचिन गोसावी, अमित वराडे, हेमंत अहिरे, प्रवीणसिंग पाटील, संजय ठाकूर, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
दानपेटीच्या रकमेतून मंदिराचे सुशोभीकरण
नागरीकांनी दानपेटीत टाकलेल्या रकमेच्या माध्यमातून मंदिराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले. दरम्यान, यशस्वीतेसाठी मनीष भंगाळे, सचिन गोसावी, अमित वराडे, हेमंत अहिरे, प्रवीणसिंग पाटील, संजय ठाकूर, उमेश ठाकूर, अक्षय सोनवणे, विकास राखुंडे, प्रदीप कोळी, युनूस खाटीक, अक्षय महाले, राहुल वरणकर, विशाल पाटील, प्रशांत नेमाडे आदींनी परीश्रम घेतले.