सव्वा लाखांचा गुटखा पकडला : दोघांना अटक

फैजपूर : रीक्षातून अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करताना दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिसात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून सव्वाव लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. मुनवर खान अफजल खान व शेख इम्रान शेख इक्बाल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मधुकर सहकारी साखर कारखाना ते फैजपूर दरम्यान रीक्षातून गुटख्याची वाहतूक होत असताना शनिवारी दुपारी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले होते. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 16 हजारांचा गुटखा व दिड लाख रुपयांची रीक्षा जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र मारोतीराव भरकट याच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोहिदास ठोंबरे करीत आहेत.